‘सेक्स’ विषयी फोनच्या माध्यमातून चर्चा करणार सोनाक्षी


आपल्या देशात आजही अशा काही गोष्टी ज्याबाबतीत उघडपणे कोणीही बोलत नाही. पण त्याबाबत कधी बोलायचे झाले तर आपण आजुबाजुचा विचार करुनच बोलतो. त्यापैकीच एक विषय आहे सेक्स या विषयावर तर आपल्याकडे कधीच मोकळेपणाने बोलले जातच नाही. पण यात आता एक एक अभिनेत्री अपवाद ठरली आहे.

बॉलीवूडची असली सोना म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा याविषयावर जनजागृती करण्यासाठी पुढे सरसावली आहे. सोनाक्षीचा ‘खानदानी शफाखाना’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती एक सेक्स क्लिनिक चालवताना या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट काही सीन्समुळे वादाच्या भोव-यात अडकला आहे.

या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात सध्या सोनाक्षी व्यस्त आहे. चित्रपटाचे प्रमोशन वेगवेगळे फंडे वापरत करण्यात येत आहे. सोनाक्षीने चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून चक्क एक आयडीयाची कल्पनाच लढवली आहे. तिने सेक्स याविषयावर बोलण्यासाठी चक्क तिचा फोन नंबरच सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर सोनाक्षीची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.


प्रथमच ‘खानदानी शफाखाना’ या सेक्स कॉमेडी चित्रपटात सोनाक्षी सिन्हा दिसणार आहे. कौटुंबिक चित्रपट करणारी सोनाक्षी कायम सेक्स कॉमेडी चित्रपटांपासून स्वत:ला दूर ठेवत आल्यामुळेच तिने ‘खानदानी शफाखाना’ हा चित्रपट स्वीकारताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण अलीकडे एका ताज्या मुलाखतीत सोनाक्षीने हा चित्रपट स्वीकारण्यामागचे कारण सांगितले.

ती म्हणाली की, मला सेक्स सारखा विषय आणि यावरचा चित्रपट मी कसा करेल, असा प्रश्न पडला होता. कारण आत्तापर्यंत केवळ आणि केवळ कौटुंबिक चित्रपट मी केले होते. मला आई-वडील काय म्हणतील, याचीही चिंता होती. पण स्क्रिप्ट मी वाचली आणि मी हा चित्रपट करायलाच हवा, असे मला वाटले. आजही सेक्स या विषयावर भारतात बोलताना लोक कचरतात. सर्दी-ताप आला तर तुम्ही डॉक्टरकडे जाता. पण सेक्सविषयक आजारांसाठी डॉक्टरकडे जाण्यात इतका संकोच का? असा प्रश्न मला पडला. या विषयावर जनजागृती करायची तर हा चित्रपट करायला हवा, असे मला वाटले.

Leave a Comment