सनी देओलमुळे भारतात परतली कुवेतमध्ये फसलेली महिला


नवी दिल्ली: भाजप खासदार आणि अभिनेता सनी देओल यांनी आपल्या कामाच्या जोरावर लोकांच्या हृदयावर विजय मिळविला आहे. दरम्यान कुवेतमध्ये अडकलेल्या पंजाबमधील एका महिला वीना या सनी देओलमुळे भारतात परतू शकल्या आहेत. पंजाबच्या रहिवाशी असलेल्या वीणा काही कारणास्तव कुवैतमध्ये अडकल्या होत्या. दरम्यान, तिच्या कुटुंबियांनी सनी देओल यांच्याकडे तिला भारतात परत आणण्यासाठी मदतीचा हात मागितला होता. याचया समस्येवर काम करताना, सनी देओल यांनी तिला भारतीय दूतावासाच्या मदतीने कुवेतमधून शोधून काढले आणि त्या आता भारतात परतल्या आहेत. यामुळ वीना आणि त्यांचे कुटुंबिय खूप आनंदी आहेत. त्याचबरोबर वडील धर्मेंद्र यांनीही याबाबत सनीचे कौतुक करत एक ट्विट केले आहे.


सनीच्या कामाचे कौतूक करताना धर्मेंद्र यांनी ट्विट करत म्हटले आहे कि नोकरी समझून आपले कर्म करत रहा, देव तुझे भले करेल…या ट्विटनंतर आपल्या कर्तव्याप्रति निष्ठा ठेव असे म्हणत त्याला आशिर्वाद दिले आहेत. याव्यतिरिक्त, सनी देओल आपला लोकसभा मतदारसंघ गुरदासपूर विकसित करण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत. आपल्या निवडणूक मोहिमेदरम्यान त्यांनी गुरदासपूरच्या लोकांना अनेक वचन दिले, जी पूर्ण करण्यासाठी सनी देओल जीवप्राण एक करुन मेहनत करत आहेत.

बॉलीवूड सुपरस्टार सनी देओल यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर गुरदासपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांना पराभूत केले. सनी देओल निवडणुकीतील विजयानंतर लोकसभा मतदारसंघातील विकासाच्या कामात व्यस्त आहेत. सनी देओल यांच्या मदतीने गुरदासपूरच्या नव्या रस्त्यांसाठी एक प्रकल्प तयार केला जात आहे. अशाप्रकारे, सनी देओलच्या या कामांचे स्थानिक लोक प्रशंसा करीत आहेत.

Leave a Comment