
फ्लोरिडा: आपण जर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि नॉन व्हेजची ऑर्डर केल्यानंतर तुमच्याकडे आलेल्या प्लेटमधील मटणाचा तुकडा अचानक नाचू लागला तर आपल्याला कसे वाटेल. साहजिकच आपण बोंबाबोंब कराल. असेच काही एका महिलेसोबत घडले आहे. तिने एका रेस्टॉरंटमध्ये मटणाची ऑर्डर दिली आणि काही सेकंदांनंतर तिच्या प्लेटमधील मटणाचा तुकडे अचानक फिरू लागला आणि प्लेटमधून टेबलवर आला, बघता बघता तो जमिनीवर पडला. हा सर्व प्रकार त्या महिलेने आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले आणि फेसबुकवर व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 कोटी 37 लाख वेळा पाहिला गेला आहे.
प्लेटमध्ये येताच अचानक नाचू लागला मांसाचा तुकडा
फ्लोरिडाची रहिवासी असलेली रे फिलिप्स यांनी तेथील एका आशियाई रेस्टॉरंटमध्ये मटणाची ऑर्डर दिली होती. मेल ऑनलाईनच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक म्हणाले की मांसचा तुकडा धाग्याच्या मदतीने काढला जात आहे.
त्याच वेळी, काही लोक म्हणतात की मांस ताजे होते, म्हणूनच ते हलत होते. व्हिडिओ पाहणाऱ्या व्यक्तीने अशी टिप्पणी केली की हे मांस पूर्णपणे ताजेतवाने होते, ज्यामुळे त्याचे अवयव आखडले असतील म्हणून ते आळस देत असेल. त्याच वेळी, दुसऱ्या एका व्यक्तीने असे म्हटले की हे मांस बेडकाचे आहे, जे जपान, चीनसारख्या आशियाई देशांमध्ये खाल्लेले जाते.
खाद्यपदार्थाच्या शौकिन असलेल्या रे या त्यांच्या फेसबुक पेजवर खाद्यपदार्थांचे भरपूर फोटो शेअर करतात. या कारणामुळे हा व्हिडिओ स्वतः रे यांनी बनवला आहे की दुसऱ्या स्त्रोताकडून शूट केला आहे हे शोधणे अवघड आहे. असे पहिल्यांदाच घडलेले नाही, याआधीही, मांसाहारी मांसाचे चित्र आणि प्लेटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
