‘जवानी जानेमन’मधील तब्बुचा फर्स्ट लूक रिलीज


सध्या आपल्या आगामी ‘जवानी जानेमन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अभिनेता सैफ अली खान व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कक्कर करत असून या चित्रपटाची निर्मिती सैफच्याच होम प्रोडक्शनमध्ये करण्यात येत आहे. अभिनेत्री तब्बूदेखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. तिचा या चित्रपटातील फर्स्ट लूक तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.


सैफ हा ‘जवानी जानेमन’ या चित्रपटात ४० वर्षीय वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर, अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया फर्निचरवाला ही त्याच्यासोबत झळकणार आहे. तिचा हा पदार्पणाचा चित्रपट आहे. सैफच्या मुलीची भूमिका ती साकारणार आहे.

या चित्रपटात तब्बूदेखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर तिने तिचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. सुरुवातीला तब्बूच्या जागी दीपिका पादुकोण आणि करिना कपूर खान यांच्या नावाची चर्चा होती. पण तब्बूच्या फर्स्ट लूकनंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Leave a Comment