‘लाल सिंग चड्ढा’ आणि ‘बच्चन पांडे’ची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर


पुढील वर्षी बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचा खिलाडी आणि मिस्टर परफेशनिस्ट यांच्यात होणारी टक्कर पाहायला मिळणार आहे. दोघांच्याही चाहत्यांसाठी २०२० मधील ख्रिस्मस हा मनोरंजनाची मेजवाणी ठरणार आहे.

एकाच दिवशी आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ आणि अक्षयचा ‘बच्चन पांडे’ हे दोन्ही चित्रपट रिलीज होणार आहेत. नुकतेच अक्षयच्या ‘बच्चन पांडे’चे फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करत चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. तर १९९४ मध्ये आलेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा रिमेक असणार आहे.


अद्वैत चंदन ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. यापूर्वी ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट अद्वैतने दिग्दर्शित केला होता. तर फरहाद सामजी अक्षय कुमारच्या बच्चन पांडेचे दिग्दर्शन करणार असून हे दोन्ही चित्रपट २०२० मध्ये २५ डिसेंबरला रिलीज होणार आहेत. आता कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment