जोडीदार दुसऱ्या महिलेकडे बघतो म्हणून प्रेयसीने डोक्यात घातला लॅपटॉप


विमान प्रवास दरम्यान परक्या महिलेकडे बघत असल्याचे म्हणत एका महिलेने आपल्या जोडीदाराच्या डोक्यात लॅपटॉप घातल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये प्रचंड जोरदार व्हायरल होत आहे. हा प्रकार अमेरिकेी विमान कंपनीच्या मियामी येथून लॉस एंजेलिस येथे जाणाऱ्या विमानात घडल्याचे सांगितले जात आहे.

या विमानाने संबंधित महिला आणि तिचा जोडीदार प्रवास करत होते. एकही आसन विमानात शिल्लक नव्हते. या महिलेचा जोडीदार त्यावेळी विमानातच बसलेल्या एका महिलेकडे सतत बघत होता, त्याच्यासोबतच्या महिलेने हा प्रकार पाहिला आणि ती चांगलीच भडकली. तिने आपल्या जागेवरुन उठत त्याला याचा जाब विचारला, जोरजोरात दोघांची भांडणे सुरू झाली.

संबंधित महिलेला शांत राहण्याचा आणि समजावण्याचा विमानातील काही सहप्रवाशांनी आणि एअरहॉस्टेसने प्रयत्न केला पण काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत ती नव्हती. तिने थोड्याचवेळात आपल्या जोडीदाराला बसलेल्या जागेवरुन उठायला सांगितले. तो देखील रागाच्या भरात जागेवरुन उठला आणि बाहेर जाऊ लागला. तेवढ्यात या महिलेने त्याचा पाठलाग करत हातातला लॅपटॉपच थेट त्याच्या डोक्यात आदळला. विमानातील सर्वच प्रवासी या प्रकारामुळे हैराण झाले होते, घटनेनंतर अनेकाजण या पुरूषाच्या प्रकृतीबाबत विचारणा करताना दिसत आहेत. विमानाच्या उड्डाणासाठी दोघांमध्ये झालेल्या या जोरदार भांडणामुळे जवळपास 15 ते 20 मिनिट उशीर झाला, या दोघांनाही त्यापूर्वी विमानातून उतरवण्यात आले.

Leave a Comment