स्त्रीलंपट निघाला पाकिस्तानी क्रिकेटर, स्क्रीनशॉट होत आहेत व्हायरल


पाकिस्तानचा युवा सलामीवीर फलंदाज इमाम उल हक एकाच वेळी अनेक मुलींना डेट करत असल्याचे समोर आल्यामुळे इमाम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. इमामशी झालेले व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीन शॉट एका ट्विटर युजरने ट्विटरवर सार्वजनिक केले आहेत. आपल्या स्टारडमचा इमामने चुकीचा वापर केला असल्याचे फसवणूक झालेल्या तरूणींचे म्हणणे आहे.


इमामवर नेटकरी सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत आहेत. पाकिस्तानमधील स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार, हे चॅट गेल्या सहा महिन्यातील आहेत. विश्वचषक स्पर्धा या काळामध्ये पार पडली होती. इमामवर पाकिस्तानी चाहत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करत टीका केली आहे. या प्रकरणाची तुलना सोशल मीडियावर अनेकांनी #MeToo शी केली आहे.


पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज इमाम व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटमध्ये एका मुलीला लग्नाला नकार देत आहे. काही चॅटमध्ये मुलीला तो बेबी म्हणून बोलत आहे. तर दुसऱ्या एका स्क्रीनशॉटमध्ये इमाम मुलीसोबतचे नाते तोडत असल्याचे दिसत आहे. व्हायरल झालेल्या स्क्रीशॉटवर इमामकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पाकिस्तान संघाकडून इमाम दहा कसोटी सामने खेळला आहे. त्याने यामध्ये ४८३ धावा केल्या आहेत. इमामने ३६ एकदिवसीय सामन्यात सात शतकांसह १६९२ धावा केल्या आहेत.

Leave a Comment