मकरंद-सिद्धार्थचा पुन्हा ‘दे धक्का’


२००८ साली मनोरंजनाचा तडका आणि यासोबतच परिस्थितीशी दोन हात करत आपली स्वप्न पूर्ण करणाऱ्या एका कुटुंबीयाची कथा अतुल काळे आणि सुदेश मांजरेकर या दिग्दर्शाकांनी ‘दे धक्का’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. त्याला प्रेक्षकांची देखील चांगलीच पसंती मिळाली होती. या चित्रपटाचा सिक्वलही आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून या चित्रपटाची रिलीज डेटही घोषित करण्यात आली आहे. हा चित्रपट २०२० मध्ये ३ जानेवारीला रिलीज होणार आहे. सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम आणि मकरंद अनासपुरे यांच्या विनोदी धमाल मस्ती सिक्वलमध्येही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

दे धक्का २ ची निर्मिती यतीन जाधव आणि स्वाती खोपकर करणार आहेत. चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शनाच्या तारखेसोबतच रिलीज करण्यात आले आहे. वेलकम टू लंडन असे या पोस्टरमध्ये म्हटले असल्यामुळे आता सिक्वलची कथा नेमकी काय असणार आणि याचा लंडनशी काय संबंध आहे, याबद्दलची प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Leave a Comment