प्रियंका चोप्राला एका इंस्टा पोस्टसाठी मिळतात तब्बल एवढे पैसे


इंस्टाग्रामच्या सर्वात श्रीमंत सेलिब्रेटींच्या यादीमध्ये देसी गर्ल ते ग्लोबल आयकॉन अशी ओळख असलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिच्या नावाचा समावेश झाला आहे.


सोशल मीडियावर प्रियंका बऱ्यापैकी सक्रिय असते. ती इंस्टा पोस्टवरुन अनेक ब्रँड्स आणि इतर कमर्शियल्स प्रमोट करत असते. इंस्टाग्रामवर तिचे 4 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीमध्ये प्रियंका 19 व्या स्थानी आहे. तर याच यादीतील सेलिब्रिटीजच्या सब सेक्शनमध्ये तिचा 16 वा क्रमांक आहे. आपल्या एका कमर्शियल पोस्टसाठी प्रियंका 271,000 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच तब्बल 1,86,94,393 रुपये आकारते.


यंदा केवळ दोन भारतीयांनी या यादीत बाजी मारली आहे. एक म्हणजे प्रियंका चोप्रा आणि दुसरा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली. अमेरिकन मीडिया पर्सनालिटी आणि बिजनेस वूमन काईली जेनर हिने इंस्टाग्राम सर्वात श्रीमंत सेलिब्रेटी 2019 मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तिला एका इंस्टा पोस्टसाठी तब्बल 8,73,41,973 रुपये मिळतात. 2016 मध्ये आलेल्या ‘गंगाजल’ चित्रपटानंतर लवकरच प्रियंका चोप्रा ‘द स्काई इज पिंक’ या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

Leave a Comment