FaceApp वापरणे सुरक्षित आहे का ?


FaceApp ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या अ‍ॅपच्या बाबतीत लोकांची दोन गटात विभागणी झाली आहे. एक गट आहे जो म्हणत आहे की, या अ‍ॅपमुळे कोणतेही नुकसान नाही आणि दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, या अ‍ॅपमुळे प्राव्हेसीला धोका आहे. लोक या अ‍ॅपच्या प्राव्हेसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. तर काही लोक म्हणत आहेत की, फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप आणि दुसऱ्या अ‍ॅप्सची प्राव्हेसी पॉलिसी अशाच प्रकारची आहे.

फेसअ‍ॅपचे संस्थापक आणि सीईओने मुलाखती देण्यास देखील सुरूवात केली आहे. हे अ‍ॅप 2017 पासून प्ले स्टोरवर आहे. मात्र अचानक जगभरात व्हायरल झाले आहे.  आता वाढत्या युजर्समुळे अ‍ॅप क्रॅश होत आहे.

हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोरबरोबरच अ‍ॅपल अ‍ॅप स्टोरमध्ये देखील फ्री विभागात नंबर 1 वर आहे. करोडो वेळा या अ‍ॅपला डाऊनलोड करण्यात आले असून, 4.5 याची रेटिंग आहे. जगातील 121 देशांमध्ये हे अ‍ॅपट्रेंडिगवर आहे.

या अ‍ॅपची पॉलिसी सांगते की, युजर्सचे फोटो आणि डाटा कंपनीजवळ राहिल आणि याला जाहिरातीसाठी विकले जाणार नाही. मात्र यामध्ये असे देखील म्हटले आहे की, या ग्रुपच्या कंपन्यांना गरज लागली तर ते युजर्सचा डाटा वापरू शकतात.

फेसअ‍ॅपच्या संस्थापकाचे म्हणणे काय ?
फेसअ‍ॅप हे एक रशियन अ‍ॅप आहे.  याच्या संस्थापकाचे म्हणणे आहे की, युजर्सच्या प्राव्हेसीला कोणताही धोका नाही. कंपनी युजर्सचा डाटा कोणत्याही थर्ड पार्टीला देत नाही. जर युजर्सला हवे असेल तर ते आपला डाटा डिलीट देखील करू शकतात.

फेसअ‍ॅपवरून डाटा कसा डिलीट कराल ?
जर तुम्हाला वाटत असेल की, फेसअ‍ॅपवरून डाटा डिलीट करायला हवा तर तुम्ही डिलीट करू शकता. यासाठी तुम्हाला अ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. तेथे सपोर्ट असा पर्याय असेल. त्यानंतर Report a bug वर क्लिक करावे. तेथे सबजेक्टमध्ये तुम्ही तुमचे मत सांगू शकता.

कंपनीने स्पष्ट केले आहे की, युजर्सचा डाटा सुरक्षित आहे. हे अ‍ॅप रशियाचे असले तरी डाटा रशियाला जात नाही.

FBI करणार या अ‍ॅपची चौकशी
हे अ‍ॅपरशियाचे असून, अमेरिका आणि रशिया हे दोघेही देश एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. अमेरिकन सेनेट चक सम्मरने या अ‍ॅपची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांना वाटते की, हे अ‍ॅप धोकादायक असून, अमेरिकन लोकांचा खाजगी डाटा परदेशात जात आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या अ‍ॅपची चौकशी FBI अथवा FTC कडून करावी.

अनेक सिक्युरिटी तज्ञांनुसार, हे अ‍ॅप तोच डाटा स्वतःकडे ठेवते, जे तुम्ही देता. फेसअ‍ॅपच्या नियम आणि अटी फेसबूक आणि व्हॉट्सअप प्रमाणेच आहेत. हे अ‍ॅपदेखील युजर्सची आधी परवानगी घेते.

अ‍ॅप वापरणे योग्य आहे का ?
हे अ‍ॅप मनोरंजनासाठी आहे. हे सत्य आहे की, तुमच्या फोटोंवर अ‍ॅपचा एक्सेस असतो. त्याचबरोबर बायोमॅट्रिक माहिती देखील त्यांच्याकडे जाते. प्राव्हेसीसंबंधीत तुम्ही गंभीर असाल तर हे अ‍ॅप नाही वापरले तरी चालेल. मात्र असेही नाही की, हे अ‍ॅप खुप मोठ्या प्रमाणात धोकादायक आहे.

Leave a Comment