राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत आज करणार प्रवेश ?


मुंबई – आज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आणखीन एक महत्त्वाचा नेता पक्षाला राम-राम ठोकत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसणार आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन अहिर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बुधवारी बैठक घेतली. तुमची कायम साथ मला लाभली आहे, अशीच साथ पुढेही कायम ठेवा. आपल्याला यापुढे अधिक ताकदीने लढायचे असल्याचे म्हणत सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले. तसेच आज सकाळी ‘मातोश्री’वर हजर राहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना मिळाल्याचे बोलले जात आहे.

सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश या सगळ्या घडामोडींमुळे निश्चित मानला जात आहे. राष्ट्रवादीचा मुंबईतील सचिन अहिर हा चेहरा मानले जातात. तोंडावर विधानसभा निवडणुकीच्या त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठा धक्का ठरणार आहे. अहिर यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रयत्न केले होते. पण ते अयशस्वी ठरल्याचे दिसते आहे.

Leave a Comment