
नाशिक – सध्या सर्वत्र छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा सुरु आहे. पण या चर्चांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे म्हणत भुजबळांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
शिवसेना प्रवेशावर छगन भुजबळांनी सोडले मौन
मी टीव्हीवर सचिन अहिरांबद्दल ऐकले, पण याबाबतीत माझे आणि त्यांचे काही एक बोलणे झालेले नाही. माझा आणि सचिन यांचा मूळचा मतदारसंघ जवळ असल्याने बहुतेक माझेही नाव जोडले जात आहे. पण या बातम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
