‘या’ राज्यानींही ‘सुपर ३०’ केला करमुक्त


गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला ‘सुपर ३०’ हा चित्रपट आहे. प्रेक्षकांची चांगलीच पसंती या चित्रपटाला मिळत असून आतापर्यंत चित्रपटाने १०४ कोटींचा गल्ला जमावला आहे. अनेक राज्यात हा चित्रपट करमुक्तही करण्यात आला आहे.


हा चित्रपट सुरूवातीला बिहार आणि राजस्थाननंतर काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही विद्यार्थ्यांसाठी उत्तम उदाहरण असल्याचे सांगत उत्तर प्रदेशातही करमुक्त केला होता. हा चित्रपट आता गुजरातमध्येही करमुक्त करण्यात आला आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती देत हृतिकने विजय रूपाणी यांचे आभार मानले आहेत. आम्हाला आमच्या कष्टाचे फळ देत ‘सुपर ३०’ करमुक्त केल्याबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण टीमच्यावतीने तुमचे मनापासून आभार, असे हृतिकने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment