प्रभास, राणा डग्गुबत्तीसोबत काम करणार आर्यन खान?


मागील अनेक दिवसांपासून अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाच्या हिंदीसिनेसृष्टीतील प्रवेशाबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत. त्याने नुकताच ‘द लायन किंग’ या चित्रपटासाठी आपला आवाजसुद्धा दिला आहे. यासंदर्भात एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, बॉलिवूड नाही तर टॉलिवूड चित्रपटातून आर्यन खान पदार्पण करणार असल्याचे वृत्त आहे. त्याला नुकतेच एका बिग बजेट तेलुगू चित्रपटासाठी विचारण्यात आल्याचे वृत्त आहे. ‘बाहुबली’सारखाच हा चित्रपट भव्यदिव्य असणार आहे.

आर्यन खान ‘बाहुबली’चे मुख्य अभिनेते प्रभास, राणा डग्गुबत्ती यांच्यासोबत काम करणार असल्याची माहिती आहे. आर्यनला चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी दिग्दर्शक गुणाशेखर यांनी विचारले आहे. चित्रपटाचे नाव ‘हिरण्यकश्यपू’ असे असून हा यामध्ये तमन्ना आणि अनुष्का शेट्टी यांच्याही भूमिका आहेत. अद्याप या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नाही. आर्यनने ‘द लायन किंग’मधील सिम्बा या भूमिकेसाठी आवाज दिला. त्याच्या या कामाची बरीच प्रशंसा झाली. आता अभिनेता म्हणून त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Leave a Comment