मालदीवच्या किनाऱ्यावर मंदिरा बेदीने लावली आग


सध्या बॉलिवूड सेलिब्रेंटीमध्ये मालदीवचा फिव्हर चढला आहे असेच चित्र दिसत आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी मागील 2-3 महिन्यांत व्हेकेशनसाठी मालदीवला पहिली पसंती दिली आहे. अभिनेत्री मंदिरा बेदी सुद्धा यात मागे नाही.


नुकतीच व्हेकेशनसाठी मालदीवला फिटनेससाठी चर्चेत असणारी मंदिरा गेली होती. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर त्यावेळचे काही फोटो शेअर केले आहेत. अनेक बॉलिवूड कलाकारांनी तिच्या या फोटोंवर कमेंट केल्या आहेत. पण काही ट्रोलर्सनी तिला ट्रोल करण्याची एकही संधी सोडलेली नाही.


सध्या आपल्या अभियनयापेक्षा अभिनेत्री मंदिरा बेदी तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ती तिचे जीम लुक नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते.


मंदिराने मालदीव वरुन परतल्यानंतर तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा बिकीनीमधील एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये तिचे सिक्स पॅक अ‍ॅब्ज दिसत आहेत.


सध्या सोशल मीडियावर मंदिराच्या या फोटोची चर्चा सुरू आहे. तिच्या फिटनेसचे काहींनी कौतुक केले आहे. तर काहींनी ‘तू रिअल आहेस का’ असे म्हणत तिला हिणवण्याचा प्रयत्न केला आहे.

मंदिराची अशाप्रकारे ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. बिकीनी लुकमुळे याआधीही अनेकदा तिला ट्रोल व्हावे लागले आहे. पण या बिनधास्त अभिनेत्रीला याचा फारसा फरक पडत नाही.

Leave a Comment