ही हिजाबधारी सुपरबाईकर बनली सोशल मीडिया सेन्सेशन


आता बाईक चालवण्यात महिला देखील मागे नसल्याचे आपण अनेकदा पाहिलेच असेल. त्यातच मुलीदेखील आता सर्ऱास बाईक चालवताना दिसू लागल्या आहेत. अगदी जड बुलेट चालवणाऱ्या मुलीही नवीन नाहीत. पण आम्ही आज तुम्हाला ज्या बाईकर बद्दल सांगणार आहोत ती सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहे. अनेक शहरी घरांमध्ये मुलींनी बाईक चालवणे ही नवी गोष्ट राहिलेली नसली तरी हे रोशनी मिसबाहच्या घरात मात्र अवघड होते.

View this post on Instagram

🐱 Caption it.

A post shared by 🧚🏻‍♀️ (@roshnimisbah) on


सोशल मीडियावर लेदर जॅकेट घालून बुंगाट बाईक चालवणाऱ्या हिजाबवाली बायकर म्हणून रोशनीचे फोटो व्हायरल होत आहेत. ती बाईक चालवताना छान लेदर जॅकेट, लेदर बूट घालते आणि डोक्यावर हिजाबही घेते. लोक वळून वळून तिच्याकडे हिजाबमधील ही बाईकर म्हणून पाहतात.


इन्स्टाग्रामवर रोशनीचे हजारो चाहते आहेत आणि तिथे तिच्या फोटोंना शेकडोंनी लाईक्स मिळतात. आत्तापर्यंत विदेशी सुपरबाईक्ससह 70 वेगवेगळ्या प्रकारच्या मोटरसायकल्स, बाईक्स, बुलेट्सवर रोशनी स्वार झाली आहे. रोशनी बाईकने देशभरात 1 लाखांहून अधिक किलोमीटर फिरली आहे.


रोशनीच्या घरी सुपरबाईक सोडा, मुलीने साधी गाडी चालवणे हीसुद्धा मोठी गोष्ट होती. रोशनीचा जन्म एका कर्मठ मुस्लीम कुटुंबात झाला. वडिलांमुळेच तिचा जीव बाईकमध्ये गुंतला. बाईकच्या नादी घरातील मोठी मुलगीच लागली, तेव्हा तिच्या लहान भावंडांसाठी ती आयकॉन होणार हे मात्र निश्चित होते.


रोशनी मिसबाहने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःसाठी पहिली बाईक घेतली. ती अॅव्हेंजर या बाईकवर हिजाब घालूनच स्वार झाली. तिची ओळख पुढे हिजाब घालून सुपरबाईक चालवणारी तरुणी अशीच झाली. बाईकने रोशनी देशभर फिरली आहे.

View this post on Instagram

“Things to do by the time You are 25 years old” : • Own the Best Cruiser ✔️ • Own a Super Sport ✔️ Allhumdullilah! i have checked a lot of things I wanted to do. (But that Bag & the Leather gears are still pending ok.) Also, Next is to Get Married Insha’Allaah 😊🤲🏻 areeee youuu listeningggg honey 🔈 All I know is, You don’t have to be Predictable always, & you necessarily don’t need someone to take you places, your talent & hard work is enough. #selfmade #BossGirl . . #zx6r #intruder #intruder1800 . . . . . . #Kawasaki #hijabibiker #roshnimisbah #newbike #sportsbike #supersports #zx6rindia #superbike #ninja6r #6r #ninjaspirit #ninja #kawasakizx6r #hijabi #zx10r #ninja10r #hayabusa #suzukiintruder #intruder

A post shared by 🧚🏻‍♀️ (@roshnimisbah) on


मोठमोठ्या, अवजड, स्टायईश बाईकची तिने स्वारी केली आहे. रोशनी मिसबाह देशभर सोशल मीडियामुळेच पोहोचली. तिला हजारो चाहते मिळाले. अनेक मुलींसाठी रोशनी रोल मॉडेल बनली आहे. अनेक बायकर्स तिच्या बाईक्सचे फोटो आणि कलेक्शन पाहून वेडे होतात. ती बाईक स्टंट करण्यातही मागे नाही. वेगवेगळ्या बाईक्स चालवणे हा तिचा छंद आहे.

Leave a Comment