लालूपुत्र तेजप्रताप बनला महादेव


बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप याने पुन्हा एकदा भगवान शिवाचे रूप घेतल्याने तो चर्चेत आला आहे. त्याने सोमवारी शिवरूप धारण करून पटना येथील शिवमंदिरात पूजा केली आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत तेजप्रताप माथ्यावर चंदन, गळ्यात रुद्राक्ष आणि व्याघ्रजीन अश्या रुपात दिसत असून त्याने शिवपिंडीवर जलाभिषेक केला.

या फोटोसोबत तेजप्रतापने एक व्हिडीओ सुद्धा सोशल मिडीयावर शेअर केला असून अनेकांनी तो पहिला आहे. तेजप्रताप नेहमीच वेगवेगळ्या रूपातील फोटो शेअर करून चर्चेत असतो. गेल्या वेळी त्याने श्रीकृष्ण रूप घेतले होते तसेच शिवरूपही घेतले होते. गेल्या वेळच्या ट्विटरवरील फोटो सोबत त्याने लिहिले होते, ‘ ‘ मी धार्मिक आहे, धर्मांध नाही. माझे आयुष्य धर्मशील आहे. माझी धोरणे धर्मनिरपेक्ष आहेत. माझा धर्म करुणा शिकवितो, घृणा नाही. माझ्यासाठी सर्व सारखे आहेत. माझी साधना समजून घेणे धर्माचे राजकारण करणाऱ्यांना शक्य नाही.’

लोकसभा निवडणुकीवेळी तिकीट वाटपावरून तेजप्रताप नाराज झाले होते आणि ते राष्ट्रीय जनता दलातून बाहेर पडणार अशी चर्चा सुरु झाली होती मात्र आपण पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

Leave a Comment