बदफैली कुत्रीला मालकाने काढले घराबाहेर


तीन वर्षे वयाच्या एका सुंदर, गुणी पामेरियन जातीच्या कुत्रीवर भलताच प्रसंग ओढवला आहे. केरळचा तिरुवनंतपुरम बाजारात ही कुत्री सापडली तेव्हा तिच्या गळ्यात एक चिट्ठी होती. यात मालकाने कुत्रीला घराबाहेर काढल्याचे कारण दिले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार या कुत्रीचे शेजारच्या घरातील कुत्र्याबरोबर अनैतिक संबंध आहेत. ही कुत्री आणि चिट्ठी सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

प्राणी प्रेमी सांगतात अनेकदा माजावर आलेल्या कुत्री मालक सोडून देतात कारण प्रजनन काळात त्यांना मॅनेज करणे अवघड असते. मात्र या मालकाने जे कारण देऊन कुत्रीला घराबाहेर काढले ते बरोबर नाही. सोशल मिडियावर या मालकाविरोधात तिखट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.


मालकाने चिठ्ठीत या कुत्रीचे गुण सुद्धा वर्णन केले आहेत. तो लिहितो, ती शहाणी, समजूतदार आहे. तिला चांगल्या सवयी आहेत. ती जादा खादाड नाही, तिला आजार नाही, आठवड्यातून पाच वेळा अंघोळ करते. गेल्या तीन वर्षात ती कुणालाही चावलेली नाही फक्त भुंकते. दुध, बिस्कीट अंडी असा आहार घेते. मात्र शेजारच्या कुत्र्याबरोबर तिचे अनैतिक संबंध आहेत.

पिपल फॉर अॅनिमल संस्थेच्या एका सदस्याने या कुत्रीला वाचविले आहे. तिचा आणि तिच्या सोबतच्या चिठ्ठीचा फोटो त्यानेच सोशल मिडियावर टाकला आहे. तो म्हणतो हा मालक नक्कीच मानसिक रोगी असला पाहिजे. याच्या घरात त्याच्या मुली कश्या राहत असतील कोण जाणे. कुत्र्यांचे कधी अवैध संबंध असतात का? इतकी काळजी होती तर त्याने कुत्रीचे रीतसर लग्न करून द्यायला हवे होते.

Leave a Comment