रेल्वे कर्मचारी दहशतवादी आणि पाकसाठी करताहेत हेरगिरी


भारतीय रेल्वेतील अनेक कर्मचारी पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनांसाठी हेरगिरी करत असल्याचे उघडकीस आले असून यामुळे रेल्वेचा गुप्तचर विभाग अधिक सतर्क झाला आहे. गेल्या काही दिवसात अश्या अनेक कर्मचाऱ्यांना पकडले गेले असल्याचे सांगितले जात आहे.

रेल्वेच्या गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेतील अनेक कर्मचाऱ्यांना पाकिस्तान मधून फोन येत आहेत आणि काही माहिती देण्याची तयारी असल्यास पैसे देण्याचे लालूच दाखविले जात आहे. दहशतवादी संघटनाही याच कामासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आहेत. मिडिया रिपोर्ट नुसार जम्मू काश्मीर मधील सिग्नल विभागात काम करणारा मुद्दसर रशीद दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि दहशतवादी कृत्यात त्याने मदत केली होती.

फिरोजपूर मधील गुरनामसिंग यानाही पाकिस्तानातून फोन आला होता आणि त्यांना माहितीच्या बदल्यात पैसे देण्याचे लालूच दाखविली गेली होती. मात्र त्यांनी ही माहिती संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. या भागात अनेकांना असे फोन येत असल्याचेही गुरनामसिंग यांनी सांगितले होते. या कर्मचार्यांना लष्कराच्या कोणत्या विशेष रेल्वे कुठून कुठे, कधी जाणार याची माहिती विचारली जाते. अटारी रेल्वे स्थानकावरील गेटमन रामकेश्वर मीणा यांच्याकडे असेच संशयास्पद कागद सापडले होते.

रेल्वे गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार पॉईटमन पदावर काम करणरे कर्मचारी दहशद्वाद्यांच्या इशाऱ्यानुसार रेल्वे रुळत खराबी करून त्यावरून धावणाऱ्या रेल्वेना नुकसान पोहोचवू शकतात. भारतीय रेल्वे जगातील सर्वाधिक कर्मचारी संख्या असलेली रेल्वे असून इतक्या प्रचंड संखेने काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांवर पाळत ठेवणे हे मोठे अवघड काम आहे.

Leave a Comment