त्या शेतकऱ्यांने सापडलेला तब्बल 60 लाखांचा हिरा विकला 13.5 लाखात


हैदराबाद – 60 लाख रुपये किमतीचा हिरा आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्यातील गोलावनेपल्ली गावातील एक शेतकऱ्याला शेतात सापडला. एक स्थानिक व्यापारी अल्लाह बख्सला या गरीब शेतकऱ्याने हा हिरा विकला. हिऱ्याच्या मोबदल्यात व्यापाऱ्याने 5 तोळे सोने आणि 13.5 लाख रुपये रोख दिली. पोलिसांनी संबधित प्रकरणाची माहिती मिळताच तपास सुरु केला आहे.

पोलिसांचे म्हणणे आहे की, हिऱ्याचे कॅरेट, रंग आणि वजनाबाबत माहिती घेण्यात आहे. कुरनूल जिल्ह्यातील एखाद्या व्यक्तीला हिरा सापडण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी एका मेंढपाळाला 12 जून रोजी 8 कॅरेटचा हिरा सापडला होता. 20 लाख रुपयांत तो हिरा विकला गेला होता.

हिऱ्याच्या उत्पादनाबाबत कुरनूल जिल्हा चर्चेत आहे. पावसाळ्यात येथील जोनागिरी, तुग्गाली, मडि्डकेरा, पगिडिराई, पेरावली, महानंदी आणि महादेवपुरम यांसारख्या गावात ग्रामस्थ हिऱ्यांचा शोधात असतात. कुरनूलच्या आसपासच्या गावातील आणि जिल्ह्यातील लोक हिऱ्याच्या शोधासाठी याठिकाणी येत असतात. यांमध्ये प्रामुख्याने कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील लोकांचा समावेश असतो. माती पावसामुळे वाहुन जाते आणि यामुळे हिरे पृष्ठभागावर येऊन चमकतात. यामुळे त्यांना शोधणे सोपे होते. हिरे सापडत असलेले क्षेत्र सर्वनारासिम्हा स्वामी मंदिराजवळ आहे. विजयनगर साम्राज्याचे कृष्णदेवराय आणि त्यांचे मंत्री तिमारासु यांनी जमिनीखाली खजिना लपवला होता. यामुळे येथे हिरे सापडत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment