यावर्षी होणार आलिया-रणबीरचे शुभमंगल


गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आम्ही तुम्हाला दिल्याच आहेत. या कपलची बॉलिवूडच्या सर्वांत हॉट कपलमध्ये गणती होते. वारंवार आलिया आणि रणबीर लग्न करणार अशी चर्चा ऐकायला येत होती. पण आता इंडिया टिव्हीने दिलेल्या एका वृत्तानुसार हे दोघे 2020 च्या शेवटी लग्नाच्या बेडीत अडकू शकतात. आलियाने काही दिवसांपूर्वी मुंबईतील जुहू परिसरात 13 कोटींचे आलिशान घरे खरेदी केले दोघांच्या लग्नाच्या चर्चांनी त्यानंतर आणखी जोर पकडला.

मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या तयारीला दोघांच्या कुटुंबीयांनी सुरुवात केली आहे. आलिया लग्नात प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाचीने डिझायन केलेला लहंगा परिधान करणार आहे. रिपोर्टनुसार एप्रिल महिन्यात आलियाने सब्यसाचीची भेट घेतली होती. दोघांमध्ये या भेटीदरम्यान वेडिंग लहंग्यासंदर्भात चर्चा झाली. अनुष्का शर्मा, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्राने आपल्या लग्नात सब्यसाचीने डिझायन केलेले लहंगा परिधान केला होता. ऋषी कपूर सप्टेंबर महिन्यात न्यूयॉर्कवरुन मुंबईत परतणार आहेत. त्यानंतर आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख फायनल करण्यात येईल.

Leave a Comment