गेम टास्क पूर्ण करण्यासाठी घरातून पळालेली मुलगी 18 दिवसांत फिरली 10 शहरे


‘टॅक्सी ड्रायव्हर – 2’ या मोबाइल गेमच्या सवयीमुळे उत्तराखंडच्या पंतनगर भागातील एक दहावीत शिकणारी मुलगी घरातून पळाली. ती घरून पळाल्यानंतर 18 दिवस 10 शहर फिरली. ती जेव्हा दिल्लीमध्ये फिरत होती तेव्हा पोलिसांनी तिला पकडले. घरात ना सांगता ती पळाली होती. पंत नगर पोलिसांना दिल्ली पोलिसांनी सूचित केल्यानंतर तिच्या घरचे तिला घेऊन गेले. दिल्ली पोलिसांनी मागच्या गुरुवारी तिला कमला मार्केटमध्ये फिरताना पहिले आणि तिची विचारपूस केली असता खुलासा झाला की, ती गेममुळे घरातून पळाली होती.

याबाबत माहिती देताना एसएसपी बरिंदरजीत सिंहने सांगितले, 1 जुलैपासून मुलगी गायब होती. तिला दिल्ली पोलिसांनी कमला मार्केटमध्ये पकडले. पोलिसांनी सांगितले की, आपल्या आईच्या मोबाइल फोनवर मुलगी ‘टॅक्सी ड्रायव्हर -2’ (साउथ कोरियन गेम) गेम खेळत होती. ती ज्यानंतर गायब झाली. सिंह यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांनी तिच्या घरच्यांशी संपर्क साधला आणि सांगितले की, मुलगी 1 जुलैला पंत नगरमधून पळाली होती. जी दिल्लीमध्ये आहे. ज्यानंतर आम्ही दिल्लीला पोहोचलो आणि मुलीला कुटुंबियांच्या स्वाधीन केले.

मुलीची सब-इंस्पेक्टर विपुल जोशीने विचारपूस केली, तिने तेव्हा सांगितले की, उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आईच्या मोबाइल फोनवर तिने गेम डाउनलोड केला होता. त्या गेमची तिला सवय झाली होती. तिने तेव्हा निर्णय घेतला की, गेमचे कॅरेक्टर (एक टॅक्सी ड्रायव्हर, गेममध्ये अनेक शहर फिरतो.) त्याप्रमाणे तीही फिरेल. जोशींनी सांगितले, एक टॅक्सी ड्रायव्हर या गेममध्ये पॅसेंजरला बसवतो आणि अनेक प्रॉब्लेम पार केल्यानंतर त्यांना ड्रॉप करतो. हे कॅरेक्टर या मुलीला रिअलमध्ये साकारायचे होते. तिला शहर फिरायचे होते. त्यामुळे ती घरातून पळाली होती. मुलीने या प्लॅननुसार घरातून 12 हजार रुपये चोरले आणि घरून पळून यूपीच्या बरेली शहरात बसने आली. तिथे पोहोचल्यावर ती लखनऊच्या बसमध्ये बसली आणि तिथून जयपुरसाठी तिने बस पकडली. त्यानंतर ती उदयपुर, जोधपुर, अहमदाबाद आणि पुणे फिरली.

दिल्लीला येण्यासाठी ती पुण्याहून जयपुरला पोहोचली. ती या प्रवासात तीनदा दिल्लीला आली होती. ती दिल्लीहुन ऋषिकेशला गेली होती त्यानंतर पुन्हा दिल्लीला आली होती. ती त्यानंतर ऋषिकेश आणि हरिद्वारला गेली आणि दिल्लीला आल्यानंतर पोलिसांनी तिला पकडले. सब-इंस्पेक्टर विपुल जोशीने सांगितले, तिचे लोकेशन पोलिसांनी जयपुरमध्ये ट्रॅक केले होते. तेथून तिने बस तिकिटासाठी भावाचा ईमेल आयडी दिला. आम्ही जेव्हा जयपुरला पोहोचलो तेव्हा ती तिथून गेली होती. मुलीने पोलिसांना सांगितले की, तिला हॉटेलमध्ये थांबण्यासाठी आयडी कार्डची गरज होती. ती त्यापासून वाचण्यासाठी रात्री स्लीपर बसमध्ये प्रवास करायची. मागचे 18 दिवस ती बिस्किट, चिप्स आणि पाणी पिऊन जगली. एवढेच काय तिने अंघोळी केली नव्हती. मुलीचे पिता एका लोकल शाळेत काम करतात, त्यांनी सांगितले, ‘मुलगी आईचा मोबाइल वापरायची. आम्हाला माहित नव्हते ती काय करायची. आम्ही नशीबवान आहोत की, मुलगी परत आली आहे.

Leave a Comment