हे मुख्यमंत्री आपल्या गावातील प्रत्येक कुटंबाला देणार १० लाख रुपये


सिद्दीपेट – तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी त्यांचे मुळ गाव असलेल्या चिंतमादाका या गावात राहणाऱ्या २००० कुटुंबांना १० लाख रुपये देणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी चिंतमादाका या मुळ गावी कार्यक्रमात बोलताना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली. चंद्रशेखर राव म्हणाले, चिंतमादाका या गावात मी जन्म घेतला आहे. माझी या गावातील नागरिकांसाठी काही कर्तव्य आहेत. मी आज जाहीर करतो, की चिंतमादाका गावात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला राज्य सरकार १० लाखाची मदत करणार आहे. नागरिक या १० लाख रुपयांच्या मदतीने त्यांना हव्या त्या वस्तू विकत घेऊ शकतात.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, या पैशातून गावकरी ट्रॅक्टर, शेती आणि शेतीसाठी उपयुक्त मशिन खरेदी करू शकतात. गावात असणाऱ्या २ हजार कुटुंबांना याचा फायदा होणार आहे. यासाठी जवळपास २ हजार कोटींचा निधी लागणार आहे. परंतु, हा निधी मी त्वरित मंजुर करणार आहे.

Leave a Comment