अनुपम खेर यांनी शेअर केला आपल्या खास दोस्ताचा फोटो


चित्रपटांमध्ये एकमेकांच्या घट्ट मित्राची भूमिका बॉलिवूडमधील अनेक कलाकार साकारत असतात. पण यातील काही खऱ्या आयुष्यात एकमेकांचे कट्टर वैरी असतात तर काहींची रिअल लाईफमध्ये घट्ट मैत्री असते. अशीच काहीशी दोस्ती अभिनेते अनुपम खेर आणि अनिल कपूर यांची आहे.


नुकताच अनुपम खेर यांनी शेअर केलेला फोटो त्यांच्या मैत्रीविषयी सर्व काही सांगून जातो. १९८९ मध्ये आलेल्या ‘परींदा’ चित्रपटाच्या सेटवरील हा फोटो आहे. अनिल कपूरने या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती. तर अनुपम खेर पोलिसा अधिकाऱ्याच्या भूमिकेत होते. अनुपम यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, जुने मित्र हे सर्वात उत्तम आरश्यासारखे असतात. आयुष्याने नकळत शिकवलेले धडे.

दरम्यान ‘राम लखन’, ‘जमाई राजा’ आणि ‘तेजाब’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये अनुपम आणि अनिल कपूर यांनी आतापर्यंत स्क्रीन शेअर केली आहे. चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास अनुपम खेर लवकरच रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Leave a Comment