वरूणच्या ‘कुली नंबर १’मध्ये झळकणार राजपाल यादव


१९९५ साली गोविंदा आणि करिश्मा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘कुली नंबर १’ चित्रपटाने त्याकाळी धमाल उडवली होती. प्रेक्षकांचा डेविड धवन यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर डेविड धवन आता याच चित्रपटाचा सिक्वेल घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाविषयीची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली होती.

वरुण धवन आणि सारा अली खान चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर आता चित्रपटातील आणखी एका पात्राविषयीची माहिती समोर आली आहे. कॉमेडी अभिनेता राजपाल यादवही या चित्रपटात झळकणार आहे. आता यावर राजपाल यादवने प्रतिक्रिया दिली आहे.

मी वरुण धवन आणि डेविड धवन यांचे या चित्रपटात काम करण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानतो. वरुणसोबत स्क्रीन शेअर करण्याची ही माझी तिसरी वेळ आहे. मी या रिमेकसाठी खूप उत्सुक असल्याचे राजपाल यादव म्हणाला. दरम्यान राजपालने याआधी ‘मैं तेरा हीरो’ आणि ‘जुड़वा 2’ सारख्या चित्रपटांत वरूणसोबत काम केले आहे. हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शनही डेविड धवन यांनीच केले होते.

मला राजगोपाल वर्मा यांच्या ‘जंगल’ चित्रपटाने कलाकार बनवले, मला प्रियदर्शन यांच्या हंगामा चित्रपटाने प्रसिद्धी मिळवून दिली. तर मला डेविड धवन यांच्या जुडवा २ चित्रपटाने कमबॅकची संधी दिल्याचे राजपाल म्हणाला. दरम्यान, ‘कुली नंबर १’ चा रिमेक पुढील वर्षी म्हणजेच १ मे २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment