
नवी दिल्ली – लष्करातील नव्या नियुक्त्यांची घोषणा केंद्र सरकारने नुकतीच केली असून भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी मराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते यापदी नियुक्ती झालेले पहिलेच मराठी अधिकारी आहेत.
यापदी नियुक्ती झालेले मुकुंद नरवणे हे पहिलेच मराठमोळे अधिकारी
लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांच्याकडून सध्या पूर्व कमांडचे प्रमुख असलेले नरवणे सूत्रे स्वीकारतील. ३१ डिसेंबरला अंबू हे निवृत्त होणार आहेत. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यानंतरचे नरवणे हे सर्वात ज्येष्ठ अधिकारी असल्यामुळे नवे लष्करप्रमुख म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे. पुढील वर्षी ३१ जानेवारीला रावत हे निवृत्त होत आहेत. लेफ्टनंट जनरल नरवणे हे मूळ पुण्याचे असून जून १९८० रोजी ते लष्कराच्या ७व्या शीख बटालियनमध्ये रुजू झाले होते. आपल्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत नरवणे यांनी लष्करातल्या विविध पदांवर आणि विविध भागांमध्ये काम केले आहे.
