ट्रम्प यांचा खोटारडा दावा भारताने फेटाळला


नवी दिल्ली – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या दोघांची अमेरिकेतील व्हाईट हाऊस या ठिकाणी भेट झाली. आपण काश्मीर प्रश्नात चर्चेसाठी मध्यस्थी करायला तयार आहोत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात मदत मागितली होती असा दावा या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी केला. पण ट्रम्प यांचा हा दावा भारताने फेटाळून लावला आहे. भारताने ट्रम्प यांची काश्मीर प्रश्नी मदत मागितली नसल्याचे एमईएने म्हटले आहे. ट्रम्प यांच्याकडे अशाप्रकारे कोणतीही विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट करुन फेटाळला आहे. काश्मीरप्रश्नी मोदींनी आपली मदत मागितली होती, मध्यस्थी करण्याची विनंती केली होती असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यात काही तथ्य नाही, कारण अशा प्रकारे कोणतीही मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितली नसल्याचा दावा भारतीय परराष्ट्र खात्याने केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी खोटा दावा केल्याची बाब स्पष्ट होते आहे.

काश्मीर प्रश्नी पाकिस्तानसोबत द्विपक्षीय चर्चा हेच भारताचे धोरण आहे. पण पाकिस्तानला ही चर्चा सुरु करायची असेल तर सीमेवरचा दहशतवाद थांबवावा लागेल. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्याची आपली तयारी आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्याकडे मदत मागितली होती असा दावा केला. मात्र भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशाप्रकारे कोतणीही मदत मागितली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Leave a Comment