अॅमेझॉनच्या गफलतीमुळे ग्राहकांची झाली चंगळ


वर्षातून एकदा येणाऱ्या अॅमेझॉन प्राईम डे सेलची ऑनलाइन शॉपिंग करणारे आवर्जून वाट पाहत असतात. यंदा हा सेल जगभरात 15 आणि 16 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. ग्राहकांना कधी नव्हे तेवढे अर्थात तब्बल 99 टक्के सवलत या सेलमध्ये मिळाल्याचे समोर आलं आहे.

आता तुमच्या मनात असा विचार सुरु असेल की या सेलबाबत आपल्यालाही माहिती होती, तरी या 99 टक्के सवलतीच्या ऑफरकडे आपले कसे लक्ष गेले नाही ? पण आता डोके खाजवण्यात अर्थात नाही. कारण ग्राहकांना 99 टक्के सवलतीचा लाभ संकेतस्थळावरील एका ‘बग’ किंवा ‘ग्लिच’मुळे घेता आल्याचे समोर आले आहे. पण याचा लाभ ज्या ग्राहकांनी घेतला त्यांच्यासाठी ही ऑफर एखाद्या दैवी चमत्कारापेक्षा कमी नव्हती.

या सेलमध्ये काही युजर्सना 9 लाख रुपयांचा कॅमेरा अवघ्या 6 हजार 500 रुपयांमध्ये खरेदी करता आला आणि हे वृत्त काहीच वेळात व्हायरल झाले आणि कॅमेरा खरेदी करण्याची संकेतस्थळावर रेस लागली. एवढ्या मोठ्या सवलतीसह मिळणाऱ्या कॅमेऱ्यांच्या यादीत सोनी, कॅनॉन आणि फूजीफिल्म यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या कॅमेऱ्यांचा समावेश होता. थोड्याचवेळासाठी ही तांत्रिक समस्या होती, पण काहींनी तेवढ्या वेळात या संधीचा फायदा उचलत 9 लाख रुपयांचा (13 हजार युएस डॉलर) Canon EF 800 lens अवघ्या 6 हजार 500 रुपयांमध्ये (95 युएस डॉलर ) खरेदी केला. यानंतर अनेकांनी सोशल नेटवर्क ‘रेडिट’वरती लाखो रुपयांचा कॅमेरा एवढ्या स्वस्तात खरेदी केल्याचा आपला आनंद साजरा केला. काहींनी तर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांचेही आभार मानले.

Leave a Comment