एलिसाचा डान्स पाहून अवाक् झाली सानिया मिर्झा


मुंबई : विंबल्डन स्पर्धा संपताच या स्पर्धेच्या उप उपांत्यफेरीत मजल मारणारी प्रसिद्ध टेनिसस्टार एलिसन रिस्क लग्नाच्या बेडीत अडकली. प्रसिद्ध टेनिसपटू आणि डेविस कपसाठी भारतीय टीमचे कॅप्टन राहिलेले आनंद अमृतराज यांचा मुलगा स्टीफन अमृतराज याच्याशी तिने लग्न केले. हे दोघे मागच्या काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. पण आता त्यांनी अधिकृतरित्या लग्न केले आहे. पण हे लग्न एलिसनच्या डान्समुळे गाजले. तिच्याच लग्नात तिने एका बॉलिवूड गाण्यावर अगदी देसी स्टाइलमध्ये ठुमके लगावत जबरदस्त डान्स परफॉर्मन्स दिला.

या अमेरिकन टेनिसस्टारचा बॉलिवूड गाण्यावरील धम्माल डान्स पाहून भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा सुद्धा अवाक् झाली. सानियाने नव्या जोडप्याला शुभेच्छा देताना लिहिले, हे ठुमके कमाल आहेत. बॉलिवूड गाण्यावरील एलिसाने लग्नातील हा डान्स व्हिडिओ शेअर करताना लिहिले, मी आता अधिकृतरित्या अमृतराज झाले. मी खूप नशीबवान आहे की मला स्टीफन अमृतराज सारखा नवरा मिळाला. माझे सर्व नवे भारतीय फॉलोअर्स कुठे आहेत. मी थोडा बॉलिवूडकर बनण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुमची मने जिंकण्याचाही.


‘बार-बार देखो’ या चित्रपटातील गाणे ‘नचले सारे बन ठन के’ या गाण्यावर एलिसाने डान्स केला. तिच्या कुटुंबीयांनी सुद्धा तिच्यासोबत या गाण्यावर एकत्र ठेका धरला. हा व्हिडिओ पाहिल्यावर अनेक भारतीय या अमेरिकन टेनिसपटूचे चाहते झाले आहेत. मूळचा भारतीय असलेल्या स्टीफनसोबत लग्न केल्याने तिला भारतात पोहोचणे सोपे झाले आहे.

Leave a Comment