इलेक्ट्राने लाँच केल्या कमी किंमत, जास्त मायलेज देणाऱ्या तीन स्कूटर


पुणे : सरकारकडूनही वाढत्या प्रदुषणामुळे देशात इलेक्ट्रॉनिक कार वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. अनेक कंपन्यांनी आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक कार आणि बाईक लाँच केली आहे. याच पार्श्वभूमीवर तीन इलेक्ट्रॉनिक स्कूटर पुण्यातील टेको इलेक्ट्रा स्टार्ट अप कंपनीनेही लाँच केल्या आहेत. या तीन मॉडेलची नावे Neo, Raptor आणि Emerge अशी आहेत.

टेको इलेक्ट्रोच्या तीन स्कूटरची किंमत 43 हजार 967 पासून सुरु होत आहे. प्रत्येक सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी या तिन्ही स्कूटरची किंमत असल्यामुळे या स्कूटरची मोठ्या प्रमाणात विक्री होऊ शकते, असे सांगितले जात आहे.
टेको इलेक्ट्राच्या तिन्ही मॉडलमध्ये Raptor हे टॉप मॉडेल आहे. तर Emerge कंपनीचे फ्लॅगशिप मॉडेल आहे. या तिन्ही स्कूटरमध्ये कंपनीने हब-माऊंटेड BLDC मोटारचा वापर केला आहे. जो 250 व्हॅटचा आहे. कंपनीने लिथियम-आयन बॅटरीचा Emerge स्कूटरमध्ये वापर केला आहे. तर Neo आणि Raptor मध्ये अॅसिड बॅटरीचा वापर केलेला आहे.

5 ते 7 तास Neo आणि Raptor मॉडल पूर्ण चार्ज होण्यासाठी लागतात. तर Emerge ला चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. Neo पूर्ण चार्ज झाल्यावर 60 ते 65km, Raptor 70 ते 85km आणि Emerge 80km मायलेज देतात. टेको इलेक्ट्राच्या स्कूटरमध्ये एलईडी हेडलाईट्स, यूएसबी चार्जिंग आणि सेंट्रल लॉकिंगसारखे फीचर दिले आहेत. याशिवाय फ्रंट डिस्क ब्रेक, रिव्हर्सिंग फंक्शन डिजिटल एलसीडी इंस्ट्रूमेंट कन्सोलसारखेही फीचर दिलेले आहेत.

अशा आहेत इलेक्ट्राच्या मॉडेलच्या किंमती
टेको इलेक्ट्रा Neo : 43,967 रुपये
टेको इलेक्ट्रा Raptor : 60,771 रुपये
टेको इलेक्ट्रा Emerge : 72,247 रुपये

Leave a Comment