आता इलेक्ट्रिक झाली मारुती-सुझुकीची वॅगन-आर


मुंबई : पेट्रोल कार ऐवजी इलेक्ट्रिक कारची मागणी सध्या देशभरात वाढत आहे. इलेक्ट्रिक कारची निर्मिती करण्यावर केंद्र सरकारने कंपन्यांवर दबाव वाढविला आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कारवर कार कंपन्या काम करीत आहेत. अलिकडेच एसयूव्हीची ‘कोना’ ही इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आली आहे. या कारच्या लॉन्चिंगनंतर अन्य कंपन्याही इलेक्ट्रिक कारला निर्मितीला प्राधान्य देत आहेत. आता देशातील सर्वात मोठी कार निर्माती मारुती सुझुकी कंपनी आपल्या आवडत्या हॅचबॅक कार वॅगनआरची दुसरी आवृत्ती शोरुममध्ये उपलब्ध करुन देणार आहे.

मारुती-सुझुकीच्या इलेक्ट्रिक वॅगनआरची चाचणीही घेण्यात आली आहे. कंपनीला या कारकडून खूप अपेक्षा आहेत. ऑटो एक्सो २०२० मध्ये ही कार लॉन्च करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच याशिवाय कंपनीने भारतातही दुसरी इलेक्ट्रिक कारची तयारी सुरु केली आहे. याबाबतचे वृत्त ‘लाईव्ह मिंट’मध्ये प्रकाशित झाले आहे. दुसऱ्या इलेक्ट्रिक कारसाठी सुझुकी मोटार कार्पोरेशनच्या इंजिनिअरनी एर्टिगा कॉमपॅक्ट एमपीव्हीची निवड केली आहे.

ग्राहकांमध्ये एर्टिगाची खासगी आणि व्यावसायिक क्रेझ जास्त आहे. कंपनीचे अभियंत्यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, ग्राहकांमध्ये एर्टिगा चांगलीच लोकप्रिय आहे. एर्टिगाचे इलेक्ट्रिक व्हर्जन सरकारकडून देण्यात येणाऱ्या सबसिडीबरोबर लोकांच्या पसंतीला उतरेल, अशी कंपनीला आशा आहे. तथापि, एर्टिगा टोयोटाच्या सहकार्याने ईव्ही बनवण्यात येत आहे किंवा नाही हे स्पष्ट झालेले नाही. लाइव्ह मिंटच्या मते, इलेक्ट्रिक एर्टिगा विद्यमान कारपेक्षा लांबी आणि रुंदीपेक्षा मोठी असेल.

मारुती वॅगन आरचे इलेक्ट्रिक मॉडेल ऑटो एक्स्पोमध्ये दाखल होईल. लोकांच्या पसंतीला ही कार उतरेल. कंपनीचा या कारची किंमत कमीत कमी ठेवण्यासाठी प्रयत्न असणार आहे. आता पेट्रोल आणि सीएनजीमध्ये कंपनीच्या कार उपलब्ध आहेत. लवकरच एलपीजी आवृत्तीत कार बाजारात येण्याची शक्यता आहे. एकदा चार्ज केल्यावर ही कार किमान १५० किमी अंतर धावेल.