विराट कोहली सारख्या दिसणाऱ्या पठ्ठ्याचे टिकटॉकवर 4 मिलियन फॉलोअर्स


खेळाचे मैदान असो अथवा सोशल मीडिया भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची लोकप्रियता सर्वच ठिकाणी आहे.  सध्या टिकटॉक या व्हिडीओ अ‍ॅपवर विराट कोहली सारख्या दिसणाऱ्या गौरव अरोराची जोरदार चर्चा सुरू आहे. टिकटॉक अ‍ॅपवर विराट कोहली सारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीचे 4 मिलियन म्हणजे 40 लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. गौरवच्या व्हिडीओला आतापर्यंत 3.5 करोड पेक्षा अधिक हर्टस (लाईक) मिळाले आहेत.

टिकटॉकवर गौरवला लोक तो विराट कोहली सारखा दिसतो म्हणून फॉलो करत आहेत. गौरवचा फक्त चेहराच नाही तर त्याने हेअर स्टाईल आणि स्वतःचा लूक देखील विराट कोहली सारखा केला आहे. गौरव टिकटॉकवर भारतीय संघाच्या जर्सीमध्ये व्हिडीओ बनवतो. तसेच तो आपल्या फॉलोवर्ससाठी रेग्युलर टिकटॉक व्हिडीओ बनवतो.

टिकटॉकचे सध्या भारतात 20 मिलियम पेक्षा अधिक युजर्स आहेत. काही दिवसांपुर्वी मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुरई बेंच टिकटॉकवर बँन आणला होता. मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले होते की, टिकटॉकमुळे युवकांवर वाईट प्रभाव पडत आहे. टिकटॉकच्या विरोधात एक जनहित याचिक दाखल करण्यात आली होती. त्या म्हणण्यात आले होते की, या अपवर शेअर केला जाणार कंटेट नुकसानकारक आहे. मात्र नंतर ही बंदी उठवण्यात आली होती. टिकटॉक देखील पबजी प्रमाणेच अनेक विवादांमध्ये अडकला आहे. टिकटॉकवर डाटा चोरीचा आरोप देखील लागला होता. त्यानंतर केंद्र सरकारने त्यांच्याकडून उत्तरे मागवली होती.

Leave a Comment