सोशल मीडियावर ट्रोल होत आहे प्रियंका आणि तिची आई


काही दिवसांपूर्वी आपल्याला अस्थमा असल्याचा खुलासा बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्राने केला होता. अशात तिचा कुटुंबीयांसोबत सिगरेट पितानाचा फोटो आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असल्यामुळे तिच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे.

प्रियंका या फोटोत आई मधु चोप्रा आणि पती निक जोनाससोबत सिगरेट पिताना दिसत आहे. खरंतर एक व्हिडिओ प्रियंकाने गेल्या वर्षी शेअर केला होता. ती यात सांगत होती, की मलाही अस्थमा आहे. यावर्षी दिवाळीत फटाके फोडू नका, दिवाळी हा सण दिवे, लाडू आणि प्रेमाचा आहे, प्रदूषणाचा नाही, असे या व्हिडिओमध्ये तिने म्हटले होते.


अनेकांनी याचाच संदर्भ देत आता तिला सवाल केला आहे, की फक्त दिवाळीतच अस्थमा होतो का? तर एका नेटकऱ्याने म्हटले आहे, दिवाळी अजून लांब आहे, प्रियंका. आतापासूनच प्रदूषण करायला लोकांनी सुरूवातही केली. तर एकाने म्हटले आहे की, वेगळीच अस्थमा रूग्ण आहे. फक्त फटाक्यांनीच तिला त्रास होतो, सिगरेटच्या धुराने नाही. या गोष्टीचा खुलासा गेल्या वर्षी प्रियंकाने केला होता की, मला वयाच्या पाचव्या वर्षीच अस्थमा असल्याचे निदान झाले. पण मला हा आजार माझी स्वप्न पूर्ण करण्यापासून थांबवू शकला नसल्याचेही तिने म्हटले होते.

Leave a Comment