‘द लायन किंग’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई


गेल्या काही दिवसांपासून हॉलिवूडच्या ‘द लॉयन किंग’ या सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची चांगलीच चर्चा आहे. शुक्रवारी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसादही दिला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसरवर ११.०६ कोटींचा गल्ला पार केला होता.


यानंतर आता चित्रपटाची दुसऱ्या दिवशीची कमाईदेखील समोर आली आहे. पहिल्या दिवशीच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी चित्रपटातच्या कमाईत जवळजवळ दुपटीने वाढ झाली आहे. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी १९.१५ कोटींचा गल्ला जमावला आहे. अवघ्या दोन दिवसांतच चित्रपटाची ३०.२१ कोटींची कमाई झाली आहे. त्याचबरोबर रविवारी या चित्रपटाने २४ कोटींची कमाई करत पन्नाशी पार केली आहे.

अनेकांनी शनिवारच्या सुट्टीनिमित्त कुटुंबियांसोबत आणि लहान मुलांसोबत हा चित्रपट पाहण्याचा पर्याय निवडल्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी कमाईत वाढ झाली आहे. तर तिसऱ्या दिवशीही रविवारच्या सुट्टीचा फायदा चित्रपटाच्या कलेक्शनला झाला आहे. तेलुगू, तमिळ, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांत भारतातील २१४० स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

Leave a Comment