
गोंदिया – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला सर्वात मोठा धक्का बसणार आहे. तसेच भाजपचे अनेक आमदार, विद्यमान कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, नेते असे अनेक लोक काँग्रेसच्या संपर्कात असून ते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट माजी खासदार तसेच काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोलेंचा गौप्यस्फोट ; लवकरच काँग्रेसमध्ये भाजपचे अनेक नेते प्रवेश करतील
काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रचार प्रमुख म्हणून नाना पटोले यांची नियुक्ती केली. दरम्यान, त्यांनी गोंदिया जिल्ह्यातून प्रचाराची सुरुवात केली. ते यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेसचे अनेक नेते, कार्यकर्ते, आमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असल्याचे सध्याच्या घडीला दिसत आहे. पण महाराष्ट्र काँग्रेसचे प्रचार प्रमुख नाना पटोले यांना यावर प्रश्न केला असता त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
