तस्लिमा नसरीन यांचा भारतातील मुक्काम वाढला


नवी दिल्ली – केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांचा निवासी परवाना एका वर्षासाठी जुलै २०२० पर्यंत वाढवण्यात आला आहे. स्वीडनच्या तस्लिमा या नागरिक असून २००४ पासून सातत्याने त्यांना भारतात राहण्याची परवानगी दिली जात आहे. तीन महिन्यांसाठी तस्लिमा यांचा निवासी परवाना वाढवून देण्यात आला होता. यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी एका वर्षाची मुदतवाढ मागितली होती.

पाच वर्षांची भारतात राहण्यासाठी मुदतवाढ मागितली असता, एक वर्षाची मुदतवाढ मला मिळाली आहे. मी यावेळी देखील पाच वर्षांच्या मुदतवाढीसाठी अर्ज केला होता, तर केवळ तीन महिन्यांची मुदतवाढ मला मिळाली आहे. मी आशा करते की, गृहमंत्री मला निदान एक वर्षाची मुदतवाढ देतील, असे ट्विट त्यांनी १७ जुलैला केले होते.

अमितशहाजी, माझा निवासी परवाना वाढवून दिल्याबद्दल मी तुमची आभारी आहे. पण मला आश्चर्य आहे की, हा परवाना फक्त ३ महिन्यांसाठी आहे. ५ वर्षांच्या परवान्यासाठी मी अर्ज केला होता पण, एकच वर्ष मला वाढवून मिळाले. मला ५० वर्षांची मुदतवाढ देण्याचे आश्वासन मा. राजनाथ सिंह यांनी दिले होते. मला खात्री आहे की, यात तुम्ही माझी मदत नक्की कराल. असे ट्विट त्यांनी त्याच दिवशी केले आहे.

तस्लिमा यांनी एका वर्षाची मुदतवाढ मिळाल्यावर परत ट्विट केले, ट्विटर खूप बलशाली आहे. मी माझा परवाना वाढवून न मिळाल्याचे १६ जुलैला लिहिले होते. हा परवाना १७ जुलैला वाढवून मिळाला पण फक्त तीन महिन्यांसाठी देण्यात आला. यानंतर माझ्या अनेक ट्विटरवरील मित्रांनी हा परवाना दीर्घ काळासाठी वाढवून द्यावा, अशी मागणी गृह विभागाकडे केली होती. यानंतर हा परवाना एका वर्षासाठी वाढविण्यात आला आहे. मी निर्णय बदलण्यासाठी विभागाचे आभार मानते.

Leave a Comment