शौचालय आणि गटारे साफ करण्यासाठी मी खासदार झालेली नाही – प्रज्ञासिंह ठाकूर


भोपाळ – पुन्हा एकदा भोपाळच्या खासदार खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी सिहौर येथे कार्यकर्ता भेटीदरम्यान शौचालय आणि गटारे साफ करण्यासाठी आपली निवड झालेली नसल्याचे वक्तव्य केले आहे. खासदार प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, नालेसफाई, शौचालय सफाई यासाठी आम्हाला खासदार म्हणून निवडण्यात आलेले नाही. पण आमची निवड ज्या कार्यासाठी झाली आहे, ते कार्य आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत.

या आधीही प्रज्ञासिंह ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी महात्मा गांधी यांच्या मारेकरी नथुराम गोडसे यांचा देशभक्त म्हणून उल्लेख केला होता. दरम्यान प्रज्ञा ठाकूर यांचे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात स्वच्छतेविषयी जागरुकता करत आहेत. भाजपचे खासदार अनुराग ठाकूर आणि हेमा मालिनी यांनी काही दिवसांपूर्वीच संसदेच्या परिसरात झाडू साफई केली होती. परंतु, प्रज्ञासिंह यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला सुरूवात झाली आहे.

Leave a Comment