प्रियंकाआधी ‘या’ देखील अभिनेत्रींचे सिगारेट ओढतानाचे फोटो झाले होते व्हायरल


सध्या सोशल मीडियावर पती निक जोनस आणि आई मधू चोप्रा यांच्यासोबत सिगारेट ओढतानाचा प्रियंकाचा एक फोटो व्हायरल होत असल्यामुळे ती सध्या नेटिझन्सच्या रडारावर आली आहे. पण प्रियंका सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणारी एकटीच नाही तर आणखी काही अभिनेत्रीही याआधी अशाप्रकारे सिगारेट ओढताना दिसल्या आहेत.

न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर सिगारेट ओढतानाचे पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान आणि रणबीर कपूर यांचा फोटो व्हायरल झाले होते. त्यांच्या अफेअरच्या चर्चाही त्यावेळी सुरु झाल्या होत्या.

स्मोकिंग करतानाचे फिटनेस फ्रिक अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनचेही फोटो समोर आले होते. ती ज्यामुळे खूप ट्रोल झाली होती.

पब्लिकली स्मोकिंग करताना अभिनेत्री मनिषा कोईराला सुद्धा दिसली होती. पण तिने काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाल्यानंतर धुम्रपान करणे सोडले आहे.

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करताना द कपिल शर्मा शोमध्ये कपिलच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती सुद्धा दिसली होती. सोशल मीडियात तिचे हे फोटो खूप व्हायरल झाले होते.

अशाच प्रकारे सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताना प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सारा खान सुद्धा स्पॉट झाली होती. सोशल मीडियावर तिचा हा फोटो खूप व्हायरल झाला होता.

अभिनेत्री तनिषा मुखर्जीचा हा फोटो खूप व्हायरल झाला होता. तिच्या हातात ज्यामध्ये सिगारेटचे पॅकेट दिसले होते. पण सिगारेट ओढताना मात्र ती दिसली नव्हती.

Leave a Comment