‘हे’ स्पायवेअर टूल करु शकतो तुमचा मोबाईल हॅक!


डेटा सुरक्षेचा प्रश्न स्मार्टफोनमध्ये असलेल्या अॅप्समुळे सातत्याने आपल्या सर्वांनाच भेडसावत आहे. सध्याच्या घडीला सोशल मीडियात फेसअॅप धुमाकूळ घालत आहे. एक स्पायवेअर हॅकर्सनी तयार केले आहे. फेसबूक, गुगल ड्राईव्ह आणि आयक्लाऊडचा डेटा अॅक्सेस ज्याच्या माध्यमातून केला जातो. हे स्पायवेअर एका इस्त्रायली सॉफ्टवेअर कंपनीने डिझाईन केले आहे.

पेगासुस (Pegasus) नावाचे हे टूल एनएसओ ग्रुपने तयार केले असून त्याच्यामध्ये गुगल ड्राईव्ह किंवा आयक्लाऊडचा डेटा अॅक्सेस करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर तुमचे फेसबुक मेसेंजरसुद्धा अॅक्सेस करू शकते. हे स्पायवेअर एकदा तुमच्या स्मार्टफोनवर आले की तुमच्या क्लाउड अकाउंटमधून संपूर्ण हिस्ट्री डाउनलोड करते. हे स्पायवेअर अवैध असूनही यूजर्सचे अकाउंट हॅक करते.

रिपोर्टनुसार एजन्सीसाठी अशा प्रकारची सॉफ्टवेअर कंपनी तयार करते. सरकारी संस्थांचा यामध्ये समावेश आहे. रिपोर्टमध्ये यावर्षी सुरुवातीला उगांडासाठी (Uganda) एक पेपर कंपनीने तयार केला होता यामध्ये पेगासुसबद्दल चर्चा केली होती. इस्त्रायलच्या या कंपनीने यापूर्वी व्हॉट्सअॅपची हेरगिरी केली होती. यामाध्यमातून आता इतर सोशल साइटसुद्धा टार्गेट केल्या जात आहेत. अद्याप असे पुरावे मिळाले नसल्याचे गुगल, फेसबुकने म्हटलं आहे. तरीही इतर कंपन्यांनी अशा प्रकारे हॅकिंग होऊ शकते का याची चाचपणी करत असल्याचे म्हटले आहे. एनएसओच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे मास कलेक्शन करणारे हॅकिंग टूल आम्ही पुरवत नाही. मात्र असे टूल तयार केले नसल्याचे कंपनीने म्हटले नाही.

Leave a Comment