‘पिता’ म्हणून ओळख मिळवण्यासाठी हा ट्रान्सजेंडर वर्षभर लढत आहे कायदेशीर लढाई


मागील वर्षी एका बाळाला ब्रिटनमधील रहिवाशी असलेला फ्रेडी मॅकोनल या ट्रान्सजेंडर तरुणाने जन्म दिला आहे, पण त्याला अद्याप मानव अधिकार कोर्टात स्वतःला या बाळाचा कायदेशीर पिता म्हणवून घेण्यासाठी लढावे लागत आहे. पण तुम्हालाही फ्रेडी हा एक तरुण असून त्याने मुलाला जन्म कसा दिला असा प्रश्न पडला असेल. मुळात, एका मुलीच्या अवयवांसह जन्मतः फ्रेडी याचा जन्म झाला होता, पण त्याला वयाच्या सुरवातीच्या काळात आपण तृतीयपंथी असल्याची जाणीव झाल्याने त्याने लिंगबदल करून घेतले, पण त्याला पिता होण्याची आवड असल्याने आपल्या पोटातील गर्भाशय तसेच ठेवले होते. फ्रेडी कालांतराने, स्पर्म डोनरच्या मदतीने गरोदर राहिला व त्याला बाळ झाले, अगदी हुबेहूब त्याच्या सारखेच हे बाळ दिसत आहे, पण फर्डी हा एक ट्रान्सजेंडर असल्याने त्याला आपल्या बाळाचा कायदेशीर पिता बनण्यास रोखले जात आहे.


याबाबत स्थानिक माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बाळाच्या जन्मानंतर त्याच्या जन्मदाखला काढायला गेलेल्या फ्रेडीला संबंधित खात्यातील जनरल रजिस्टर कडून दाखल्यावर पिता म्हणवून घेण्यासाठी नकार मिळाला, ब्रिटनच्या 1836 मधील कायद्यान्व्ये जन्म दाखल्यावर आईचे नाव असणे बंधनकारक आहे, पण फ्रेडी हा जन्मदाता असला तरी त्याचे नाव आई म्हणून टाकता येणार नव्हते, या वादाला यातूनच सुरुवात झाली आहे. फ्रेडीचे वकील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात केलेल्या युक्तिवादात, मुलीपासून मुलगा बनेपर्यंतचा फ्रेडीचा प्रवास मांडला होता शिवाय, फ्रेडीला बाळाच्या जन्माच्या एक वर्ष आधीच लिंग मान्यता प्रमाणपत्र मिळाले असल्याचेही सांगण्यात आले होते.

दरम्यान, अद्याप याप्रकरणी कोर्टाचा अंतिम निर्णय येणे बाकी आहे. पण आता जगभरातील अनेक देशांमध्ये तृतीयपंथीना कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे, अनेक ठिकाणी होणाऱ्या प्राईड परेड सारख्या उपक्रमांमधून या तृतीयपंथींना सामान्य नागरिकांप्रमाणेच समाजातील प्रत्येक ठिकाणी आपले अस्तित्व मांडण्यास प्रोत्साहन दिले जात आहे, पण असे असतानाही फ्रेडी याला आपल्याच बळावर हक्क बजावण्यासाठी कोर्टात मागणी करावी लागणे हे दुर्दैवच म्हणायला हवे.

Leave a Comment