12 वर्षाच्या विद्यार्थिनीने बनवला कपड्यांची घडी घालणारा रोबोट


आपल्यापैकी अनेकांच्या घरी कधी ना कधी कपाटाचा दरवाजा उघडताच अंगावर येणारे कपडे, कधी बेड वर तर कधी जमिनीवर अस्थाव्यस्थ पडलेले कपडे असा नजारा पहिला असेल, आणि मग एकदा सुट्टी मिळूदे हे असे म्हणत यावर कपडे घड्या करून बंदोबस्त करण्याचा निर्धारही केला असेल. पण यात नेहमीप्रमाणे आपला आळस आड येऊन हे काम लांबणीवरच पडते.

विदेशी शास्त्रज्ञांनी काही वर्षांपूर्वी अशा मंडळींसाठी एक कपडे घडी घालणारा रोबोट बनवला होता. पण फक्त श्रीमंतांना परवडेल एवढी या रोबोटची किंमत असल्यामुळे पैसे नाहीत पण आळस आहे अशा मंडळींना काहीच मार्ग उपलब्ध नव्हता. पण नायझेरियामधील एका 12 वर्षीय फातिमा अब्दुल्लाही हिने आता यावर मार्ग शोधून काढला आहे. अवघ्या काहीच रुपयांमध्ये कपड्यांची घडी घालणारा एक रोबोट फातिमाने घरच्याघरी तयार केला, अवघ्या तीन सेकेंदात हा रोबो कपडे घडी करू शकतो. सध्या सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडीओ पाहायला मिळत आहे.


कोडिंग शिकणारी फातिमा ही एक विद्यार्थिनी असून याच ज्ञानाच्या आधारे तिने हा रोबो बनवला आहे. शनिवारी आणि रविवारी खूप कपडे धुतल्यानंतर त्यांच्या घड्या घालण्याच्या कामाला बराच वेळ लागतो. मी हा रोबोट त्यावर उपाय म्हणून बनवला आहे, यात काही पीन, लाईट्सच्या बीम्स आणि एव्ही थ्री ब्रिक्स म्हणजे एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी प्रोग्राम केलेले सर्किट्सच्या मदतीने हा रोबोट मी तयार केला आहे, असे तिने सांगितले. तसेच आपण हा रोबो सध्या घरीच वापरात आहोत पण काहीच दिवसात याला अधिक आकर्षक रूप देऊन स्थानिक बाजारात विक्री करण्याचा मानस फातिमाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment