या गाड्यांचे उत्पादन थांबवणार टाटा मोटर्स


मुंबई : अनेक ऑटोमोबाईल कंपन्या BS-6 एमिशन नियमांमुळे अनेक गाड्यांचे उत्पादन थांबवण्याच्या विचारात असून BS-6 एमिशन नियम पुढील वर्षी 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. कंपन्यांना सध्याच्या डिझेल इंजिनला BS-6 नियमांनुसार अपग्रेड करण्यात खूप खर्च येणार आहे. डिझेल कारचे उत्पादन थांबवण्याचा निर्णय प्रसिद्ध ऑटोमोबाईल निर्माता कंपनी मारुती सुझुकीनेही घेतल्यानंतर आता टाटा मोटर्स आपल्या चार गाड्यांचे उत्पादन थांबवण्याची शक्यता आहे. टाटा मोटर्स सर्वात कमी मागणी असणाऱ्या गाड्यांचे उत्पादन थांबवू शकते.

कंपनीने हा निर्णय कमी मागणी आणि BS-6 एमिशन नियमांनुसार गाड्यांना अपग्रेड करण्यासाठी येणारा मोठा खर्च हे सर्व पाहता घेतला आहे. टाटा कंपनीने काहीच महिन्यांपूर्वी अनेक गाड्यांमधील विना एअरबॅग असलेल्या व्हेरिअंटचे उत्पादन थांबवसल्यानंतर आता आपल्या काही गाड्यांचेही उत्पादन टाटा थांबवणार आहे. BS-6 एमिशन नियम हेच यामागील कारण आहे.

बाजारात टाटाच्या बोल्ट हॅचबॅक या गाडीची मागणी खूप कमी असल्यामुळे या गाडीचे उत्पादन थांबवण्याच्या विचारात कंपनी आहे.

कंपनीच्या सर्वात जास्त मागणी असलेल्या गाड्यांपैकी टाटाची झेस्ट कॉम्पॅक्ट सिडॅन ही एक आहे. तरीही या गाडीचे उत्पादन कंपनी थांबवणार आहे.

टाटाच्या सर्वात प्रसिद्ध गाड्यांपैकी सफारी एसयुव्ही ही एक आहे. पण एकेकाळी मोठी मागणी असलेल्या या गाडीला सध्या तितकी मागणी नाही. कंपनी या गाडीच्या जागी नव्या BS-6 एमिशन नियमांनुसार असलेल्या बाजारात उतरवू शकते.

हेक्सा कॉसओवर या गाडीचे उत्पादनही टाटा थांबवणार आहे.

Leave a Comment