भारतातील सर्वाधिक प्रभावशाली महिलांच्या यादी ‘ही’ खेळाडू अव्वल


भारतातील प्रभावशाली महिलांच्या यादीत सर्वसामान्यपणे बॉलिवूड अभिनेत्रींचा समावेश होतो. पण काहीसे वेगळे चित्र यावेळी आहे. भारतातील राजकीय, क्रिडा तसेच विदेशातील महिलांनी बॉलिवूडच्या सौंदर्यवतींना मागे टाकत यावेळी भारतातील टॉप 10 प्रभावशाली महिलांच्या यादीत एका खेळाडूने स्थान पटकावले आहे.

भारतातील प्रभावशाली महिलांच्या यादीत 6 वेळा ‘वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप’चं विजेतेपद पटकावणारी बॉक्सर मेरी कोम सर्वात अव्वल स्थानावर आहे. 10.36 % एवढा तिचा स्कोअर आहे.

या यादीत दुसऱ्या स्थानावर भारताच्या पहिल्या महिला आपीएस अधिकारी आणि पॉन्डेचरीच्या सध्याच्या लेफ्टनंट गव्हर्नर किरण बेदी आहेत. त्यांचा स्कोअर 9.46 % एवढा आहे.

भारतातील सर्वाधिक प्रभावशाली महिलांच्या यादीत स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांचा स्कोअर 9.23% आहे

या यादीत भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांचा स्कोअर 7.13 % आहे.

प्रभावशाली महिलाच्या यादीत यंदा बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण पाचव्या क्रमांकावर आहे. तिचा स्कोअर 6.35 % आहे.

यंदा भारतातील प्रभावशाली महिलांच्या यादीत नोबल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई हिने स्थान पटकावले आहे. तिचा स्कोअर 5.75 % आहे.

भारतातील प्रभावशाली महिलांच्या यादीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा यांचाही समावेश आहे. त्यांचा स्कोअर 5.53 % आहे.

भारतातील प्रभावशाली महिलांच्या यादीत ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा आठव्या क्रमांकावर आहे. तिचा स्कोअर 5.11 % आहे.

या यादीत अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नवव्या क्रमांकावर आहे. तिची लोकप्रियता अद्याप कमी झालेली नाही. तिचा स्कोअर 5.10 % आहे.

भारतातील प्रभावशाली महिलांच्या यादीत माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिचा सुद्धा समावेश आहे, तिचा स्कोअर 4.52 % आहे.

Leave a Comment