कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल चार वर्षांनी बाद झाली ‘ही’ महिला क्रिकेटपटू


ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूने क्रिकेटच्या विश्वात अजब कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये महिला क्रिकेट संघाची फलंदाज एलिक पॅरी ही तब्बल चार वर्षांनी बाद झाली आहे.

सध्या इंग्लंड विरोधात सुरु असलेल्या अॅशेस मालिकेत पॅरी 3 वर्ष, 11 महिने आणि 6 दिवसांनंतर बाद झाली. 2015मध्ये पॅरी शेवटची बाद झाली होती. 5 वर्षात तिने 655 चेंडूचा सामना करत 329 धावा केल्या आहेत.

इंग्लंड विरोधातच 2015मध्ये झालेल्या सामन्यात 13 धावांवर पॅरी बाद झाली होती. त्यानंतर तिने नोव्हेंबर 2017मध्ये द्विशतक केले होते. गेली 11 वर्ष पॅरी कसोटी सामने खेळत आहेत.

पॅरी ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू आहे. तिने वयाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16व्या वर्षी पदार्पण केले होते. त्याचबरोबर तिची त्याचवेळी निवड महिला फुटबॉल संघातही झाली होती.

8 कसोटी सामन्यात पॅरीने 68.50च्या सरासरीने 548 धावा केल्या आहेत. यात दोन शतक तर एका अर्धशतकाचा समावेश आहे. 213 धावांची पॅरीची सर्वश्रेष्ठ खेळी आहे.

Leave a Comment