अन् तो भारतीय इन्स्टाग्रामची एक चूक शोधून झाला लखपती


इन्स्टाग्राममधील एक बग चेन्नईतील एका तरूणाने शोधून काढला आहे. त्या तरूणाचे लक्ष्मण मुथैया असे नाव असून त्याला फेसबुकने बक्षीस म्हणून ३० हजार डॉलर म्हणजेच २० लाख रूपयांची रक्कम दिली आहे. इन्स्टाग्राम आणि फेसबुकच्या सेक्युरिटी टीमने मुथैयाने चूक लक्षात आणून दिल्यानंतर सुरूवातीला त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता. इन्स्टाग्राम अकाउंट परवानगी न घेता कसे हॅक करता येते, हे मुथैयाने सांगितले.

कोणत्याही अकाउंटला हॅक करणे इन्स्टाग्राममधील या बगमुळे शक्य होते. इंस्टाग्राम अकाउंटवरून कोणत्याही पासवर्ड रिसेट, पासवर्ड रिकव्हरी कोडसाठी रिक्वेस्ट पाठवली जाते. मुथैयाने इन्स्टाग्रामकडून मिळालेला रिकव्हरी कोड टाकून हॅक करता येत असल्याची चूक शोधून काढली.

एका ब्लॉग पोस्टमध्ये मुथैयाने लिहिले आहे की, ज्यावेळी मी फेसबुकच्या सिक्युरिटी टीमला याबाबत माहिती दिली. त्यांना सुरूवातीला काही माहिती कमी असल्यामुळे पटवून देणे अशक्य झाले होते. मी त्यानंतर आणखी माहिती गोळा करून त्यांना पटवून दिले. मला यावेळी यश आले. बगला फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या टीमने फिक्स केला आणि मला ३० हजार डॉलर बक्षीस दिले. या आधीही बग शोधण्याचे काम लक्ष्मण मुथैयाने केलेले आहे. त्याने यापूर्वीही फेसबुकच्या डेटा डिलीशन आणि डेटा डिस्क्लोजर या बगचा शोध घेतला होता.

Leave a Comment