आर्यन खानची गोरी मैत्रीण गौरीला पसंत


शाहरुख खान पुत्र आर्यन खान सध्या लायन किंग चित्रपटामुळे चर्चेत आहे तसाच तो त्याच्या गोऱ्या मैत्रिणीमुळेही चर्चेत आहे. मिडिया रिपोर्ट नुसार आर्यनची ही मैत्रीण एक ब्लॉगर असून आर्यन या मुलीला हृद्य देऊन बसला आहे. गेले अनेक दिवस ते एकमेकांना डेट करत आहेत आणि त्याची ही मैत्रीण मम्मी गौरी खानला पसंत पडली आहे.

आर्यनने नुकतीच युके मधील सेव्हन ओक्स शाळेतून पदवी मिळविली आहे आणि या समारंभाला शाहरुख, गौरी आणि सुहाना उपस्थित होते. तेव्हा आर्यनच्या मैत्रिणीची भेट गौरी बरोबर झाली आणि गौरीला ही मैत्रीण आवडली. अर्थात तिचे नाव अजून उघड झालेले नाही. आर्यन बॉलीवूड मध्ये कधीही प्रवेश करू शकतो आणि त्याला लाँच करण्यासठी करन जोहर उत्सुक आहे अश्या बातम्या मागेच आल्या आहेत.

Leave a Comment