पोखरण मध्ये रणगाडा भेदी ‘नाग’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी


जयपूर – भारताकडून स्वदेशी बनावटीच्या एंटीटँक गाइडेड मिसाइल (एटीजीएम) म्हणजेच ‘नाग’ची राजस्थानातील पोखरण येथे यशस्वी परीक्षण केले आहे. भारताच्या या यशाबद्दल संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कौतुक केले आहे. ‘नाग’ हे तिसऱ्या पिढीतील रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे.

350 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च भारताला या क्षेपणास्त्रासाठी आला आहे. उच्च क्षमतेची उपकरणे यात बसविण्यात आली असून क्षेपणास्त्र अधिक तापमानात देखील त्याची दिशा भटकत नाही. 10 वर्षांपर्यंत या क्षेपणास्त्राला कोणतीही देखभाल न करता वापरले जाऊ शकते. नाग क्षेपणास्त्र वजनाने अत्यंत हलके असून, एकूण वजन केवळ 42 किलो आहे. नाग क्षेपणास्त्राचा वेग 230 मीटर प्रतिसेकंद एवढा आहे. हे क्षेपणास्त्र एकदा डागण्यात आल्यावर ते रोखता येत नाही. याचा मारक पल्ला क्षमता 8 किलोमीटर असून 2019 च्या अखेरपर्यंत याचा सैन्यात समावेश केला जाऊ शकतो.

Leave a Comment