तब्बल 50 वर्षे जुनी बाटली ऑस्ट्रेलियातील मच्छीमाराला सापडली किनाऱ्यावर


सिडनी- ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण किनारपट्टीवरील एका मच्छीमाराला एका ब्रिटीश मुलाने 50 वर्षांपूर्वी चिठ्ठी लिहून काचेच्या बाटलीत टाकलेला संदेश सापडला. ही बाटली पॉल इलियट नावाच्या मच्छीमाराला सापडली असून त्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, आपला मुलगा जेहासोबत मासे पकडताना त्याला एक बाटली सापडली. त्यावर एक संदेश लिहीला होता, 50 वर्षे जुना तो संदेश आहे. तो आणि त्याचा मुलगा आता मिळून ती चिठ्ठी लिहीणाऱ्या व्यक्तीला शोधणार आहे.

13 वर्षीय पॉल गिब्सनच्या ऑस्ट्रेलिया प्रवासाचे वर्णन संदेशात करण्यात आहे. एवढ्या दिवस बाटली समुद्रात कशी काय तरंगली, यावरही अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. एका ओसियनोग्राफर डेविड ग्रिफिनने सांगितले की, बाटली 50 वर्षे तरंगत राहू शकत नाही.

Leave a Comment