तामिळनाडूतील वाहतुक पोलीस झाले हायटेक


चेन्नई – तामिळनाडूच्या कोईम्बतूर जिल्ह्यातील वाहतुक पोलिसांच्या गणवेषावर कॅमेरे लावण्यात आले आहेत. रस्त्यावर होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जाणार आहे. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना याच व्हिडिओ रेकॉर्डिंगवरून पकडून दंडात्मक कारवाई केली जाईल. रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण टाळण्यासाठी या कॅमेऱ्यांचे वाटप उईर नावाच्या एका सेवाभावी संस्थेने केले आहे. त्या पोलिस आयुक्तांची अधिकृत मंजुरी आहे.

उईर एनजीओकडून हे कॅमेरे शहरातील पोलिस आयुक्त सुमित शरण यांनी कार्यालयात आणले. अशा स्वरुपाचे डिव्हाईस सुरुवातीला 70 पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आले. यापैकी 20 डिव्हाइस इंटरनेटला कनेक्ट करण्यासाठी त्यामध्ये समिकार्ड टाकण्यात आले. या पोलीस कर्मचाऱ्यांचे कॅमेरा फुटेज थेट पोलिसांच्या नियंत्रण कक्षात जाणार आहेत. एका कॅमेऱ्यात एकावेळी सलग 8 तास व्हिडिओ टेलिकास्ट केले जाऊ शकते. रस्त्यावर होणारी निदर्शने आणि सार्वजनिक कार्यक्रमात याचा उपयोग होणार आहे. हे व्हिडिओ ऑनलाइन देखील उपलब्ध राहतील.

पोलिस आयुक्त शरण यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, वाहतुक पोलिसांच्या कामगिरीत कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पारदर्शकता येईल. भ्रष्टाचाराला आळा घालण्यात यातून मोठी मदत होईल. जे काही पोलीस कमर्चारी करत आहेत त्याचे थेट प्रक्षेपण नियंत्रण कक्षात होईल. विनाकारणच्या वादात अडकण्यापासून यामुळे पोलीस दूर राहतील. सोबतच, एखाद्या वाहनचालकाने नियम मोडल्यास योग्य दंड वसूल केला की नाही याची माहिती मिळेल.

Leave a Comment