आता होत आहे विश्वविजेत्या संघातील खेळाडूंच्या हॉट पत्नींची चर्चा


आयसीसी 2019 च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकचे यजमानपद भुषवलेल्या इंग्लंडने क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच विश्वविजेता होण्याचा मान मिळवला. इंग्लंडने अगदी अटीतटीच्या या सामन्यात आयसीसीच्या वादग्रस्त नियमांमुळे विजय मिळवला. पण सध्या या खेळाडूंपेक्षाही या खेळाडूंच्या पत्नींची चर्चा होत आहे.

इंग्लंडला विश्वविजेता बनवणारा इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनची पत्नी तारा नेहमीच त्याच्यासोबत असते. लंडनच्या एका लक्झरी फॅशन कंपनीमध्ये तारा ही काम करते. या दोघांनी आठ वर्ष एकत्र राहिल्यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लग्न केले.

तर, ब्युटी थेरेपिस्ट म्हणून इंग्लंडच्या विजयात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या ख्रिस वोक्सची पत्नी एमी पेशे आहे. ख्रिस आणि एमी दोघेही बालमित्र होते. दोघांनी अखेर 2017मध्ये लग्न केले.

एका पबमध्ये इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जो रूट पत्नी कैरी कोर्टल काम करत होती. रूट आणि कैरी यांची त्याच पबमध्ये मैत्री झाली. दोघांनी डिसेंबर 2018मध्ये लग्न केले.

धडाकेबाज फलंदाज जॉस बलटरची पत्नी लुईस पायलट आहे. ऑक्टोबर 2017मध्ये दोघांनी लग्न केले.

सध्या आपल्या फलंदाजीमुळे इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा फलंदाज बेन स्टोक्स चर्चेत आहे. पण त्याच्या पत्नीने सामन्यानंतर त्याला केलेला किस सगळ्यात जास्त गाजला. बेनची पत्नी क्लेअर रॅटक्लिफ शाळेत शिक्षिका असून ऑक्टोबर 2018मध्ये दोघांचे लग्न झाले होते.

Leave a Comment